गोल पोस्ट महाराष्ट्र उदगीर-अहमदपूर रोडवर गंडी पाटी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार ठार

उदगीर-अहमदपूर रोडवर गंडी पाटी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार ठार

उदगीर, लातूर ९ मार्च २०२४ : उदगीर तालुक्यातील गंडी पाटी घाटात उदगीर अहमदपूर रोडवर अज्ञात वाहनांच्या धडकेत एक २२ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिवाजी अंकुश वाकळे राहणार येवरी ता उदगीर हा युवक ८ मार्च रोजी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्याच्या एम.एच.१२ पी.डब्ल्यू ९५९१ याक्रमांकाच्या दुचाकीवरून उदगीर येथून गावाकडे जात असताना गंडी पाटी घाटात अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली यात तो जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती लोकांनी ११२ वर कॉल करून दिली, अपघाताची माहिती मिळताच उदगीर ग्रामीणचे पोलीस नाईक नाना शिंदे,पोलीस नाईक केंद्रे,होमगार्ड डी.एस.केंद्रे,होमगार्ड व्यंकट सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक

error: Content is protected !!
Exit mobile version