गोल पोस्ट महाराष्ट्र रावणकोळा येथे दोन युवकांचा चाकूने भोसकून खून…

रावणकोळा येथे दोन युवकांचा चाकूने भोसकून खून…

जळकोट, १७ जानेवारी २०२४ : रावणकोळा येथे ऑनलाइन लावलेले दुकान बंद केल्याचा राग मनात धरून महेश उत्तम सूर्यवंशी व विकास शिवाजी सूर्यवंशी या दोन युवकांचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना १३ जानेवारीला रात्री घडली. याची फिर्याद वैयजंतीमाला उत्तम सूर्यवंशी यांनी जळकोट पोलीस ठाण्यात दिल्यानंतर आरोपी प्रकाश मुरहारी सूर्यवंशी, अमित माधव गायकवाड, सुदर्शन ट्युब्या दयानंद सूर्यवंशी, सतीश सुखराज वाघमारे, शैलेजा यादव सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक

error: Content is protected !!
Exit mobile version