गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे “त्या” तरुणीचा गळा दाबून खून

“त्या” तरुणीचा गळा दाबून खून

पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग येथील इमारतीत उच्च शिक्षित तरुणीच्या खूनप्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शवविच्छेदन अहवालातून तिचा ३० नोव्हेंबरला गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

राहत्या घरी तरुणी मंगळवारी मृतावस्थेत आढळुन आली होती. तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमाही आढळून आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी सिंहगड पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

तेजसा श्यामराव पायाळ (वय २९, रा. फ्लॅट क्रमांक १५, माणिकबाग ,मूळ- बीड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

शहरातील मध्यवर्ती माणिकबागेतील रामकृष्ण सोसायटीत उच्चशिक्षित तेजसाचा खून करण्यात आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
नोकरीच्या शोधात एम बी ए शिक्षण घेतल्यानंतर तेजस काही महिन्यांपुर्वी पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबागेत तेजसासह आई व दोन बहिणी समवेत वास्तव्यास होती. आठ दिवसांपूर्वी ती एकटीच पुण्यात आली होती. त्यानंतर ३० नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास तीन मित्रांसमवेत घरात होती. त्याच रात्री तेजसाचा खून झाल्याचे निषन्न झाले आहे. त्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version