गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतनीकरण केलेल्या महसूल भवनाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या...

जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतनीकरण केलेल्या महसूल भवनाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन…

जालना, १५ मार्च २०२४ : जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतनीकरण केलेल्या महसूल भवनाचे आज रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. अद्यावत अशा महसूल भवनाचे दानवे यांनी यावेळी कौतुक करुन जालना जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही दिली. सदर कार्यक्रमास आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

उद्घाटन झाल्यांनतर मान्यवरांच्या हस्ते महिला व बाल विकास विभागामार्फत आयोजित जिल्हास्तर चाचा नेहरु महोत्सवात सहभागी बालगृहातील खेळाडू बालकांना आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातंर्गत खो-खो व फूटबॉलचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडुंना ट्रॅकसुट, किट व शुजचे वितरण करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून हे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यावेळी दानवे यांनी खेळाडूंचे कौतुक केले. ते म्हणाले की, आज आपला देश विविध क्षेत्रात वेगाने प्रगती करीत आहे. पायाभूत सुविधा मजबूत केल्यामुळे रेल्वे, रस्ते, विमानतळ, नवीन संसद भवन व अन्य शासकीय इमारतींचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे. जगात आपल्या देशाचा नावलौकिक वाढला आहे. जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताला लाभले आहे. या परिषदेतील सर्व देशांनी विकसित भारताचे कौतुक केले आहे. विविध क्षेत्राचा करण्यात आलेला विकास व अद्यावतीकरणामुळे भारताची जगाच्या पटलावर एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच नागरिक आणि खेळाडू उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version