गोल पोस्ट इतर राजकारण ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा लोणे यांची बिनविरोध निवड

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा लोणे यांची बिनविरोध निवड

ठाणे, दि. १५ जुलै २०२०: ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणूकीनंतर कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी १५ जुलै रोजी पूर्ण झाला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष गोटीराम पवार यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडुन आल्या आहेत तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.

एन.के.टी कॉलेजच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सभा सचिव छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या. या निवडणुकीत दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी घोषित केले. ही प्रक्रिया पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

अध्यक्षपदाचा कारभार हाती घेताच आपण ग्रामीण भागाकडे लक्ष आहोत आणि त्याच बरोबर ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करू . रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याकडे देखील आम्ही लक्ष देणार असल्याचं सुषमा लोणे यांनी या वेळी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version