गोल पोस्ट क्रीडा युरो-२०२० स्पर्धेसाठी हॉलंड,जर्मनी पात्र

युरो-२०२० स्पर्धेसाठी हॉलंड,जर्मनी पात्र

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणार्‍या युएफा युरो – २०२० फुटबॉल स्पर्धेसाठी हॉलंड, जर्मनी आणि क्रोएशिया हे संघ पात्र ठरले आहेत.
जून २०२० मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी एकूण २४ संघांना प्रवेश मिळणार आहे. आतापर्यंत १६ संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे.
हॉलंडची कामगिरी : शनिवारी रात्री झालेला हॉलंड आणि नॉर्दर्न आयर्लंड यांच्यातील युरो पात्रता स्पर्धेचा सामना बरोबरीत संपला. हॉलंडने ७ पैकी ५ सामने जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात १६ गुण आहेत. २०२४ विश्वचषकानंतर कोणत्याही मोठ्या स्पर्धेत प्रवेश मिळवण्याची ही हॉलंडची पहिलीच वेळ होती. दरम्यान, बेल्जियमने या पात्रता स्पर्धेत ९ पैकी ९ सामने जिंकत आपले स्थान पक्के केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version