गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुण्यात व्हॅलेंटाईन-डे ला ‘लव्ह परेड’

पुण्यात व्हॅलेंटाईन-डे ला ‘लव्ह परेड’

पुणे: पुण्यात व्हॅलेंटाईन-डे अर्थात १४ फेब्रुवारीला अनोखी ‘लव्ह परेड’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी या लव्ह परेडमध्ये सहभागी होणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटना सदस्य राहुल म्हस्के यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी म्हस्के म्हणाले की, ‘व्हॅलेंटाईन डे’ ला गुलाबाच्या फुलांची मागणी वाढते. त्यामुळे गुलाब शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बरकत आली आहे.
प्रेमाचा प्रसार व्हावा, यासाठी शहरात राहणारी शेतकरी मुले आणि इतर सर्वसामान्य नागरिक विशेषतः तरुण – तरुणी यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
१४ फेब्रुवारीला फर्ग्युसन कॉलेज रोडची सुरुवात जिथं होते, त्या गुडलक चौकातून कृषी महाविद्यालय म्हणजे जिथं हा रस्ता संपतो या मार्गावर ही ‘लव्ह परेड’ निघणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version