गोल पोस्ट महाराष्ट्र भोकरदन मधील माजी सैनिकाच्या घरातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला

भोकरदन मधील माजी सैनिकाच्या घरातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला

भोकरदन, जालना १ ऑगस्ट २०२४ : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील माजी सैनिक राजेंद्र तांगडे यांच्या घरी चोरी झालीय. तांगडे हे आपल्या परिवारासह दोन ते तीन दिवसांपूर्वी जम्मू- काश्मीर येथे फिरण्यासाठी गेले असून घर बंद असल्याची संधी साधून मध्यरात्री चोरट्यांनी घराच्या पाठीमागून कडीकोयंडा तोडून 3 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. यात सोन्या चांदीचे दागिने कॅम्पुटर, लॅपटॉप तसेच काही रोख रक्कम याचा समावेश आहे.

स्थानिक रहिवाशांना चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ याची माहिती पारध पोलिसांना दिली, यावेळी पारध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांच्या टीमने घटनास्थळी पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे

error: Content is protected !!
Exit mobile version