गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे विजयी दिनानंतर कोरेगाव भीमा परिसर स्वच्छ

विजयी दिनानंतर कोरेगाव भीमा परिसर स्वच्छ

पुणे : भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी पार पडलेल्या विजयी स्तंभाला मानवंदना देण्यायाठी राज्य भरातून लाखो अनुयायी आले होते. या परिसरात मागील वर्षापासून माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने या संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छतेची मोहिम हाती घेतली गेली आहे.

या या स्वच्छता मोहिमेमध्ये रिपब्लिकन पक्ष, स्वच्छ संघटना, जनवाणी संघटना, पुनावाला ग्रुप, पेरणे ग्राम पंचायत, समाज प्रबोधन ग्रुप विश्रांतवाडी पुणे तसेच आंबेडकर अनुयायी ग्रुप व इतर अनेक सेवा करणारे कार्यकर्ते सामिल झाले होते.

डाॅ. धेंडे यांच्याबरोबर बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, विजय कांबळे, भीमराव जाधव, संदिप चाबुकस्वार, हेमंत मोरे, पेरणे ग्राम पंचायतचे सरपंच ठोंबरे जनवाणी चे फारुख तसेच विशाल सोनवणे, नरवडे व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!
Exit mobile version