गोल पोस्ट महाराष्ट्र जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातील वरूड येथे गाव चलो अभियानला सुरुवात

जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातील वरूड येथे गाव चलो अभियानला सुरुवात

जालना, २४ फेब्रुवारी २०२४ : जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील वरूड येथे गाव चलो अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे नेतृत्वात हे अभियान राबविण्यात येत असून केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती घरोघरी जाऊन सांगण्यात येत आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातील वरूड येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. यावेळी मंत्री दानवे यांनी शासन द्वारा राबविलेल्या योजनांची माहिती देणाऱ्या पत्रिका, पोस्टर वाटप करून वरूड येथील नागरिकांशी चर्चा ही केली. यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version