गोल पोस्ट इतर शुभेच्छा कोरेगावमुळ येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विठ्ठल दादासो थोरात

कोरेगावमुळ येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विठ्ठल दादासो थोरात

कोरेगावमुळ ता.हवेली, दि. ८ जुलै २०२०: कोरेगावमुळ येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विठ्ठल दादासो थोरात यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच लोकेश कानकाटे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने सदरच्या जागेवर बिनविरोध निवड करण्यात आली.

कोरेगावमुळच्या सरपंच लता आंनदा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी सदरचे कामकाज पाहिले. यावेळी सरपंच लता चौधरी, मा. सरपंच – ग्रामपंचायत सदस्या रोहिणी कानकाटे, कविता काकडे, पुजा शितोळे, मा. उपसरपंच – सदस्य नारायण शिंदे, लोकेश कानकाटे, आप्पासाहेब शिंदे, प्रा. विजय कानकाटे, माजी सरपंच ताराचंद कोलते, माजी उपसरपंच विठ्ठल शितोळे, माजी सरपंच प्रमोद बोधे, मा. तंटामुक्ती अध्यक्ष मुकिंदा काकडे आदी उपस्थित होते.

मा.उपसरपंच लोकेश कानकाटे सह विद्यमान उपसरपंच विठ्ठल थोरात यांचा सन्मान सोशल डिस्टंसिंग ठेऊन उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आला. गावाच्या सर्वागीण विकासाला सर्वांना विश्वासात घेऊन चालना देेणार असे नूतन उपसरपंच विठ्ठल थोरात यांनी निवडीनंतर सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version