गोल पोस्ट राजकारण ‘आपके राज्य में हम आपकी बिना परमिशन के आ गए है’, राज्यपालांचा...

‘आपके राज्य में हम आपकी बिना परमिशन के आ गए है’, राज्यपालांचा अजित पवारांना चिमटा

पुणे, १५ ऑगस्ट २०२०: पुणे जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. कौन्सिल हॉल इथे हा सोहळा पार पडला. ह्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील उपस्थित होते. राज्यपाल जेव्हा या ध्वजारोहणाचा कार्यक्रमासाठी उपस्थित झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार पुढे आले असता राज्यपालांनी त्यांना चांगलाच टोमणा लगावला आहे.

अजितदादांना पाहताच राज्यपाल म्हणाले की,’आपके राज्य में हम आपकी परमिशन के बिना आ गए है’. राजपाल यांनी दिलेला हा टोला ऐकल्यानंतर अजित पवार यांनी स्मित हास्य दिले आणि राज्यपालांचे स्वागत केले. राज्यपालांनी काढलेला या चिमट्या नंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या सह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version