गोल पोस्ट इतर राजकारण आम्ही दगडं मारुन सभा बंद केल्यात !

आम्ही दगडं मारुन सभा बंद केल्यात !

जळगाव, २३ एप्रिल २०२३: खासदार संजय राऊत शिवसेनेच्या कोणत्याच आंदोलनात नव्हते. आंदोलन कसं करावं हे त्यांना माहिती नाही. आम्ही दगडं मारुन लोकांच्या सभा बंद करणारे लोक आहेत. त्यामुळे राऊतांनी आम्हाला आव्हान देऊ नये, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी जळगावात भेट दिली.

संजय राऊत आमच्या मतांवर खासदार झाले आहेत. त्यांची भीती आम्ही कशाला बाळगायची ? त्यांच्यात हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा. आणि पुन्हा खासदार होऊन दाखवा. आमची मतं घ्यायची, खासदार व्हायचं, पुन्हा आम्हालाच काहीही बोलायचं का? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला अक्कल शिकवू नये, अशी टिका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version