गोल पोस्ट इतर राजकारण मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण… – रुपाली...

मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण… – रुपाली चाकणकर

मुंबई, ४ सप्टेंबर २०२०: अभिनेत्री कंगना रानौत ही सध्या सोशल मीडिया वर चर्चेत आहे. कंगनाच्या वादग्रस्त  ट्विटमुळे ती अडचणीत आली आहे.  काल दिनांक ३ सप्टेंबर रोजी तिने मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. त्यातच आज तिने एक ट्विट केले आहे ज्यात ती म्हणाली आहे, “मी मुंबईला येत असून कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा.” याच ट्विटवरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिले आहे. चाकणकर यांनी ट्विट करून कंगनावर निशाणा साधत प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन लोकांसाठी आम्ही वेळ वाया घालवत नाही. कंगणा रानौत तु उतरलेल्या विमानतळापासून ते तुझ्या घरापर्यंत जी मुंबई तु पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. शुटींगच्या सेटपासून ते चित्रपट गृहांपर्यंत जी सुरक्षितता आहे ती मुंबई पोलिसांमुळेच आहे. सध्या काही काम नसल्यामुळे फुटकळ प्रसिद्धीसाठी अशी बालिश बडबड करताना स्वतःच्या तोंडाला लगाम घाल. मुंबई पोलिस देशाचा अभिमान असल्याचं म्हणत चाकणकरांनी कंगनावर टीकास्त्र सोडलंय.

तसेच मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती खूप अडचणीत आली आहे. कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान करत तिने आपल्या अडचणी आणखीन वाढवल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version