गोल पोस्ट महाराष्ट्र कोण खोटं बोलतंय ?

कोण खोटं बोलतंय ?

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२२ : दिपाली सय्य्द शिंदे गटात सहभागी होणार, या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांची एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे फोटो व्हायरल होत आहे. याला कारण सुषमा अंधारे आहेत, असंही म्हंटलं जातंय.

या चर्चांनंतर सुषमा अंधारे यांनी या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं. मी दोन दिवसांपूर्वीच रात्री दिपाली ताईंना फोन केला असून त्यांनी या अफवा असल्याचं सांगितलं होतं.

तसेच त्यांनी असंही नमूद केलं होतं की, मी पक्षात नवीन आहे. मला पक्षात स्थान निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे मी भाषणं देत रहाणार.

पण यावर दिपाली सय्यद यांनी कोणतेच भाष्य केले नाही. त्यामुळे नक्की काय चाललंय, हे समजायला मार्ग नाही. त्यांनतर त्यांनी कधी नव्हे ते उद्धव ठाकरेंवर विरोधात्मक विधान केले. याचा अर्थ नक्की काय समजायचा? हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. त्यामुळे सुषमा अंधारे विरुद्ध दिपाली सय्यद असा सामना रंगायला वेळ लागणार नाही.

त्यामुळे आता नक्की कोण खोटं बोलतंय आणि कोण काय पाऊल उचलणार, हे पहाणं गरजेचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

error: Content is protected !!
Exit mobile version