गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक पत्नीने मुलाच्या मदतीने केली पतीची निर्घृणपणे हत्या

पत्नीने मुलाच्या मदतीने केली पतीची निर्घृणपणे हत्या

नांदगाव, नाशिक ६ ऑक्टोबर २०२३ : नाशिकच्या नांदगाव तालुक्यात सततच्या गुन्हेगारीच्या घटनांनी शहर हादरत आहे. रोजच कुठे ना कुठे खून, प्राणघातक हल्ला, मारहाण, लूट, चोरीच्या घटनांनी ऊत आणला आहे. अशातच गुरुवारी रात्रीच्या सुमारास न्यायडोंगरी येथे खुनाची घटना उघडकीस आली आहे.

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथिल रहिवासी तसेच मयताची आई, मीराबाई ममराज राठोड वय वर्षे ५६ रा.पेट्रोल पंपाजवळ न्यायडोंगरी यांच्या फिर्यादीवरुन, संशियत आरोपी उषा संजय गायकवाड व अल्पवयीन मुलगा या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. मयत संजय गणेश गायकवाड वय वर्षे ३७ यांचा खुन झाला असुन मयत संजय गायकवाड हा दारु पिऊन मारहाण करत असल्याने त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपी नंबर १ उषा संजय गायकवाड हिने दिनांक ५/६/२०२३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मयताच्या डोळ्यात मिर्ची पुड टाकेली, आरोपी नंबर २ ने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास देवुन संजय यास ठार मारले.

नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४३३ /२०२३ भा द वी कलम ३०२ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित पत्नी व मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मागदर्शनाखाली पोलिस उपनिरक्षक मनोज वाघमारे सहा.पोलिस नाईक चव्हाण, गोपनीय शाखेचे दत्ता सोनवणे, अनिल शेरेकर, भारत कांदळकर, विनायक जगताप यांनी हि कारवाई केली.

न्युज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version