गोल पोस्ट इतर राजकारण राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? पाण्यावर काठी मारली म्हणून ते विभागत नाही, सुषमा...

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? पाण्यावर काठी मारली म्हणून ते विभागत नाही, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान

मुंबई,५ जुलै २०२३ : राज्यातील घडामोडी पाहता, राजकारणासह सत्तेची समिकरणे बदलत चाललेली आहेत. अनेक वर्षांपासून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातून नेत्यांचे पक्षांतर होत होते. पण गेल्या तीन एक वर्षात शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत मात्र दोन गट तयार झाले आहे.

यापूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेत महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष तयार केला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. तर एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनेतून एक गट घेऊन बाहेर पडले. यानंतर आता राष्ट्रवादीत अशी उभी फुट पडल्याने राज्यात राजकारणाचा पुर्ण चिखल झाल्याची भावना सामान्य कार्यकर्ता आणि मतदाराची झाली आहे. तर आता शिवसेना आणि मनसे म्हणजेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी मनसे कार्यकर्तेच करताना दिसत आहेत. चार दिवसांपूर्वी या दोघा भावांना एकत्र येण्याची साद् घालणारे बॅनर्स मुंबईत आणि ठाण्यात झळकले.

त्यावरून ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या पाण्यावर कोणी काठी मारली म्हणून ते विभागत नाही. नाती, ऋणानूबंध आहेत ती काही बोलून तुटत नसतात. कार्यकर्त्यांची मागणी जर आहे तर याच्यावर फारच विचार केला पाहिजे. अभिनंदन करत कौतुक पण केले पाहिजे. पण शेवट निर्णय हा पक्ष नेतृत्वाने घ्यायचा. तर जोपर्यंत याच्यावर राज ठाकरे स्पष्ट बोलत नाही तोपर्यंत यावर स्पष्ट बोलणे कठीण असल्याचे मत अंधारे यांनी व्यक्त केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version