गोल पोस्ट महाराष्ट्र भर रस्त्यावर महिलेची गळा चीरुन हत्या, आरोपी पती पोलीसांच्या ताब्यात

भर रस्त्यावर महिलेची गळा चीरुन हत्या, आरोपी पती पोलीसांच्या ताब्यात

धुळे १३ एप्रिल २०२४ : कौटुंबिक वादातून पतीने धारदार शस्त्राने पत्नीच्या गळ्यावर वार करून हत्या केल्याची घटना धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. भर दुपारी रस्त्यावर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली असुन या घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पतीला पोलिसांनी अवघ्या काही वेळातच ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवपूरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या समांतर रस्त्यावर आज दुपारी २ वाजेच्या सुमारास ४२ वर्षीय महिलेच्या गळ्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रेड्डी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधी, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस कर्मचारी धर्मेंद्र मोहिते, चंद्रशेखर नागरे, पुरुषोत्तम सोनवणे,दिपक गायकवाड, मनोहर पिंपळे,सुनिल राठोड, नरेश मराठे,बंटी साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या काही मिनिटांत संशयित पतीस ताब्यात घेतले. यावेळी मयत महिला अनिता हिरामण बैसाणे वय ४० असून, घरात सुरु असलेल्या कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे.पती हिरामण वाल्मीक बैसाणे यानेच घरगुती वादातून पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : भाग्यश्री बागुल

error: Content is protected !!
Exit mobile version