गोल पोस्ट महाराष्ट्र जालना शहरातील देहेडकरवाडी ते लक्कडकोट रस्त्याच्या कामाला सुरूवात

जालना शहरातील देहेडकरवाडी ते लक्कडकोट रस्त्याच्या कामाला सुरूवात

जालना ४ फेब्रुवारी २०२४ : जालना शहरातील देहेडकरवाडी ते लक्कडकोट रस्त्याच्या कामाला सुरूवात झालीय. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांतून वारंवार रस्त्याचे काम करण्याची मागणी होत होती. या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाले असून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलीय.

रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळणीच झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना आपली वाहने चालवताना चांगलीच कसरत करावी लागायची. मात्र या समस्येबाबत नागरिकांनी आवाज उठवल्याने रस्त्याच्या कामाला आता मुहूर्त मिळाला असून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झालीय. भूमिगत नालीचे काम पूर्ण झाल्यावर सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. लवकरच या समस्येतून मुक्तता होणार असल्याने या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version