गोल पोस्ट महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

पिंपरी, दि.२७ जुलै २०२० : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आज दि.२७ जुलै सकाळ पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

रविवारी (दि.२६) रोजी रात्री भाजपच्या एका नगरसेवकाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. या संदर्भात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या मुख्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी (दि.२७) सकाळपासून रुग्णालयाच्या बाहेर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्या नगरसेवकाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी का केली? याचे कारण अजून पर्यंत कळाले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version