गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे नवले रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

नवले रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

पुणे, दि.३० मे २०२०: पुण्यातील सिंहगड परिसरात असलेल्या नवले हॉस्पिटलमध्ये डिसेंबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पगार मिळालेले नाहीत. या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी आज( शनिवारी) सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

यामध्ये नर्स,डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पुण्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या रुग्णालयामध्ये ८० कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. तर ६० जण आयसोलेशनमध्ये आहेत. या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन सुरू केल्यामुळे रुग्णांची सकाळपासून मोठी गैरसोय होत आहे.

लॉकडाऊन काळात कामावर न आलेल्या जवळपास २०० जणांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यापासून पगार नसल्याने आश्वासन दिली जात आहेत. त्यामुळे वैतागून या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version