गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे कार्यकर्ता मेळावा व पदनियुक्ती समारंभ संपन्न

कार्यकर्ता मेळावा व पदनियुक्ती समारंभ संपन्न

पुणे, २ नोव्हेंबर २०२०: मतदारसंघातील प्रभाग क्र. 5 च्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्यात प्रभाग क्र. 5 ची कार्यकारिणी पुणे शहराध्यक्ष मा. आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

प्रभागातील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक, सुनिता गलांडे, संदीप जऱ्हाड, शितल शिंदे, संतोष खांदवे, राहुल दळवी, विशाल साळी, सुधीर गलांडे, ज्ञानेश्वर शिंदे, मुकुंद गलांडे, S R मिश्रा, डॉ अस्लम शेख, संतोष घोलप, शशी बोडके, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version