गोल पोस्ट इतर राजकारण यंदाच्या निवडणुकीत बिचकुले पती-पत्नीची ‘हवा’

यंदाच्या निवडणुकीत बिचकुले पती-पत्नीची ‘हवा’

मुंबई: मराठी बिगबॉस फेम अभिजित बिचकुले यांनी वरळी आणि त्यांची पत्नी अलंकृता यांनी साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक निवडणूक लढवली होती. परंतु दोन्हीकडे बिचकुले जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंकडून पराभवाचा सामना करावा लागला.आदित्य ठाकरेंना ८९ हजार २४८मत मिळाली.आणि बिचकुले यांना अवघी ७८१ मते मिळाली.त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. याशिवाय अभिजित बिचकुले यांच्या पत्नी अलनकृता यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवली होती.
यात श्रीनिवास पाटील यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. उदयनराजे भोसले यांचा मोठा पराभव झाला. यात बिचकुले यांना १६४५ मते मिळाली. त्यामुळे त्यांचेही डिपॉझिट जप्त झाले. यंदाच्या निवडणुकीत मात्र बिचकुले फॅमिली चांगलीच नावारूपाला आल्याचे पहायला मिळाले.

error: Content is protected !!
Exit mobile version