गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा येरवडा कारागृहात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी

येरवडा कारागृहात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी

पुणे, दि.२४ मे २०२०: पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच कोरोनाशी लढणाऱ्या या योध्यांना दिवसरात्र काम करावे लागत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील येरवडा कारागृह येथे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची आज ( रविवारी) आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांना सोशल डिस्टसिंग व सॅनिटायझेशनचे महत्व सांगण्यात आले.

कोरोना आजाराची पूर्ण माहिती देऊन, त्याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच मास्क वापरताना घ्यावयाची काळजी व होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात याबद्दल पुनीत बालन ग्रुप व मेट्रो मेडिकल फौंडेशन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version