गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे तुमची छोटी मदत या युवकाला देऊ शकते उभं राहण्यास बळ

तुमची छोटी मदत या युवकाला देऊ शकते उभं राहण्यास बळ

पुणे, १६ एप्रिल २०२१: ओमकार दीपक कानडे या युवकाचा ६ महिन्यापूर्वी अपघात झाला होता. अपघाता दरम्यान त्याच्या पायात गंभीर इजा झाली होती ज्यामध्ये नाईलाजानं त्याचा पाय डॉक्टरांना काढून टाकावा लागला. आधीच कोरोनामुळं सर्वांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अशा आर्थिक परिस्थितीत या युवकावर असं संकट ओढवलं असताना त्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हा युवक भोर तालुक्यातील रहिवासी असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे. सध्या डॉक्टरांनी त्याला कृत्रिम पाय बसवण्याचा सल्ला दिला असून सदर खर्च हा त्यास पेलावणारा नाही. या कृत्रिम पायाची किंमत ४,७१,०३० एवढी असून त्यांच्या कुटुंबीयांकडं व मित्र परिवाराकडून काही रक्कम जमा करण्यात आली आहे. अजूनही त्याला किमान २ लाख रुपयांची आवश्यकता आहे.

सध्या ओमकार कानडे याला पुढील उपचारासाठी पैशांची अत्यंत गरज असून त्यासाठी त्याने इतर जनतेकडं मदतीची साद घातली आहे. जर आपण त्याला मदत करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या क्रमांकावर गुगल पे च्या माध्यमातून पैसे पाठवू शकता. तुमच्याकडून येणारी छोटी रक्कम देखील त्याला उभं राहण्यास सहाय्य करणार आहे.

गुगल पे

ओमकार कानडे:- 9011136988
किरण कानडे:- 9699994095

error: Content is protected !!
Exit mobile version