गोल पोस्ट महाराष्ट्र पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

पुरंदर, १६ एप्रिल २०२४ : पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे सोमवारी वीज अंगावर पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून १७ वर्षीय शुभम सोमनाथ चौधरी याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

पाठरवाडी येथील गट नंबर ११८ मध्ये गावातील मुले क्रिकेट खेळत होती. शुभम चौधरी हा बॉलिंग करत असल्याने त्यांनी पायातील चप्पल बाजूला काढून ठेवली होती. अचानक वीज शुभमाच्या आंगावर कोसळल्याने शुभम १० फूट दूर फेकला गेला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक जण जखमी झाला असून
इतर ८ मुले सुरक्षित आहेत.

न्यूज अनकट प्रतिनीधी : राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version