गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक नाशिकमध्ये खूनाचे सत्र सुरूच, चाकूचे वार करून युवकाचा खून

नाशिकमध्ये खूनाचे सत्र सुरूच, चाकूचे वार करून युवकाचा खून

नाशिक, १७ ऑगस्ट २०२३ : नाशिकमध्ये खूनाचे सत्र सुरूच असून आज अंबड गाव व परिसरात महालक्ष्मी नगर येथे हनुमान मंदीर जवळ, मयुर दातीर वय २० वर्ष, या युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी मयुरच्या छातीवर व पोटावर चाकुने वार करत त्याचा खून केला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा खळबळ उडालीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मयुर हा दुचाकीवर महालक्ष्मी नगर मधल्या हनुमान मंदीर जवळ आज दुपारी दोन वाजता आला असता, दुचाकीवर त्याचा पाठलाग करत आलेल्या तिघांनी त्याच्या छातीवर व पोटावर सपासप चाकुने वार करून त्यांचा खून केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ सह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत असून त्यातील एकजण अट्टल गुन्हेगार असल्याचे समजते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version