गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट युवराज म्हणतो “हा”सर्वोत्तम कर्णधार

युवराज म्हणतो “हा”सर्वोत्तम कर्णधार

नवी दिल्ली: सिक्सर किंग युवराज सिंग हा नेहमीच आपल्या परखड मतांमुळे चर्चेत असतो. नुकतेच त्याला एका मुलाखतीत सर्वोत्तम कर्णधार कोण, असे विचारले असता त्याने महेंद्रसिंग धोनीचे नाव सांगितले.

या मुलाखतीत युवराजने सांगितले की, सौरव गांगुलीने भारताची सुरुवातीची टीम बनवली होती. ज्यामध्ये गांगुलीच्या कर्णधारपदाच्या काळात भारत २००३ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये हरला होता. नंतर २०११ साली धोनीच्या कर्णधारपदाच्या काळात भारताने वर्ल्डकप जिंकला होता. आता धोनी कागदावर कर्णधार नसेलही, मात्र तो मैदानावर उतरल्यानंतर नेहमी कर्णधारच असतो. युवराजच्या या मतामुळे धोनीच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर चांगलीच जोर धरत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version