गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट जडेजाच्या चेंडूने फाफ आणि एल्गर हैराण

जडेजाच्या चेंडूने फाफ आणि एल्गर हैराण

 
 दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसामन्यादरम्यान भारताने दमदार फलंदाजी करत 502 धावांचा डोंगर रचला. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची दमछाक होताना दिसत आहे.दरम्यान, रवींद्र जडेजाने दमदार गोलंदाजी करत आफ्रिकेच्या फाफ आणि एल्गर यांच्या जोडीला घाम फोडला आहे. 
 *नेमके काय घडले? :* आफ्रिकेला फलंदाजीसाठी चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि एल्गर यांच्या जोडगोळीने डाव सावरला. हि जोडी फोडण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजीसाठी रवींद्र जडेजाला पाचारण केले. मात्र जडेजाने फाफ फलंदाजीला आला असता तब्बल 4 टप्प्यांचा चेंडू टाकला. यामुळे फाफ गोंधळून गेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 

error: Content is protected !!
Exit mobile version