अधिवेशन बंदोबस्तातील पोलिसांना दहा रुपयात जेवण

नागपूर: सध्या नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या पोलिसांच्या जेवणाचा बंदोबस्त नागपूर शहर पोलिसांकडून करण्यात आला आहे. गोंडराजाचा पुतळा असलेल्या विधानसभा चौकात पोलिसांनी बुफे पद्धतीने जेवण वितरीत केले.

हे जेवण अवघ्या १० रुपयात सर्व पोलिसांना देण्यात आले. जेवणाचा दर्जा कसा काय आहे हे पाहण्यासाठी खुद्द पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी स्वतः उपस्थिती लावून त्यांनी जेवणाचा आस्वादही घेतला. त्यांनी पदार्थांची चव चाखून समाधान व्यक्त केले.

तसेच त्यांनी स्वत: पोलिसांना जेवण वाढले देखील. हे जेवण घेतल्यानंतर बाहेर गावाहून आलेल्या पोलिसांनीही जेवणाच्या दर्जा व चवीबद्दल अतिशय समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या. असे जेवण तर घरीदेखील मिळत नाही, असे काही पोलिसांनी म्हटले. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना दहा रुपयात पोटभर जेवण या संकल्पनेचे सर्वांनी स्वागत व कौतुक केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा