पुणे- सोलापूर महामार्गावर दोन अट्टल दरोडेखोरांना पकडले

इंदापूर: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी देवकर नजीक मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गाच्या गस्ती पथकाने दोन अट्टल दरोडेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की  महामार्गाचे गस्ती पथक अशोक नागरगोजे आणि अमोल ठोंबरे हे मध्यरात्रीच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील महामार्गावर गस्त घालीत असताना लोणी देवकर नजीकच्या सेवा रस्त्यावर एक विना क्रमांक चार चाकी वाहन उभे असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी त्याठिकाणी जाऊन पहिले असता चार इसम मद्यप्राशन करीत असल्याचे आढळून आले तसेच त्यांच्या हालचाली महामार्ग गस्ती पथकातील महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली.त्याच दरम्यान त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतर गेल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात शेजारी आपले वाहन थांबवून पलायन केले. त्यातील दोन इसमांना पकडण्यात जवानांना यश आले याबाबत कर्त्यावर असलेले  महाराष्ट्र सुरक्षा बलाचे इन्चार्ज नवनाथ फराटे यांनी तात्काळ इंदापूर पोलीस ठाणे आणि डाळज पोलीस चौकी यांना कळविले तात्काळ पोलीस याठिकाणी हजर झाले तसेच त्या इसमाची झाडाझडती घेऊन आणि वाहनांची झडती घेतली असता वाहनातील एका पिशवीमध्ये मौल्यवान दागिने ,दारूच्या बाटल्या ,महागडे मोबाईल आणि शस्त्र आढळून आली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी आशिष भिसे (वय २५ वर्षे रा. मार्केट यार्ड पुणे) आणि सुनील गायकवाड (वय २५ वर्षे रा.बिबवेवाडी पुणे) यांनी यापूर्वी कुठे जबरी चोरी केली आहे का किंवा कुठे प्राणघातक कृती केले आहे का याबाबत देखील पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा