दापोली विंटर सायक्लोथॉन २०२३ उत्साहात संपन्न, ३५० स्पर्धकांच्या सहभागाने रंगली स्पर्धा

दापोली, रायगड २९ नोव्हेंबर २०२३ : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी आणि सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित, दापोली विंटर सायक्लोथॉन २०२३, सिझन ४ सायकल स्पर्धा रविवार आणि सोमवार २६-२७ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील ६ ते ८० वयोगटातील ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. दापोली गावतळे, उन्हवरे पांगारी, पन्हाळेकाजी, आगरवायंगणी, मळे, दापोली या ७५ किमी मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली.

यामध्ये दापोली उन्हवरे पन्हाळेकाजी आगरवायंगणी या ५१ किमी मार्गावर अटीतटीची सायकल रेस स्पर्धा झाली. पुरुष खुला गटात हनुमान चोपडे- पुणे, दत्तात्रय चौगुले- सांगली, आर्यन मालगे- कोल्हापूर, यश थोरात- ठाणे, हर्षद पाटील- कोल्हापूर, केदार पवार- पुणे, ओंकार खर्चे- पुणे, सिद्धार्थ दवंडे- मुंबई, प्रजिन नाडर- मुंबई, रेहान शेख- परभणी हे विजेते ठरले. महिला खुला गटात सिद्धी शिर्के- पुणे, प्राजक्ता सूर्यवंशी- सांगली, श्रुष्टी कुंभोजे- कोल्हापूर, योगेश्वरी कदम- सांगली, मिकेला डिसोझा- मुंबई ह्या विजेत्या ठरल्या. सिंगल गिअर गटात देवर्षी पाटील- रायगड, सुशांत मंडले- सांगली, शेख खुदबोद्दीन- परभणी, हेमंत लोहार- कोल्हापूर, बाळू हिरेमठ- कोल्हापूर हे विजेते ठरले. एमटीबी गटात ओमकार खेडेकर- पुणे, ओजस भनंग- पनवेल, गौरव तांबे- पनवेल, विकास रोठे- नगर, केदार देशमुख- मुंबई हे विजेते ठरले.

पुरुष मास्टर ४०+ वयोगटात अनुप पवार- मुंबई, राजेश रवी- चिंचवड, सतीश सावंत- पुणे, प्रवीण पाटील- मुंबई, डॉ आदित्य पोंक्षे- पुणे हे विजेते ठरले. त्यांना प्रत्येकी रुपये १११११, ७७७७, ५५५५, ३३३३, ११११, १०००, चषक, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. महिला ४० ते ४९ वयोगटात प्रिती गुप्ता- पुणे, हर्षल सरोदे- डोंबिवली, मनिषा गोयल- अंधेरी तसेच महिला ५० ते ५९ वयोगटात सुजाता रंगराज- माटुंगा, क्रिपा कंदाडे-नेरुळ, हिना पारीख- विलेपार्ले आणि महिला ६०+ वयोगटात मंगला पै- माहीम मुंबई या विजेत्या ठरल्या. पुरुष ५० ते ५९ वयोगटात मारियान डिसोझा- प्रभादेवी, अजय सुर्वे- बांद्रा, संजय सावंत- मुंबई तसेच पुरुष ६० ते ६९ वयोगटात डॉ आदित्य पोंक्षे- पुणे, अतुल ओझा- गोरेगाव तसेच पुरुष ७० ते ७९ वयोगटात गजानन भातडे- रत्नागिरी, प्रवीणकुमार कुलते- ठाणे आणि पुरुष ८०+ वयोगटात भीमराव सूर्यवंशी- पलूस सांगली हे विजेते ठरले. आयुष जोशी- आसूद, विष्णुदास चापके, मंथन कांबरे, चेतन पारधी, महेश दाभोळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सोमवार २७ नोव्हेंबर राजी झालेल्या शॉर्ट सिटी लुप राईड मध्ये वेदिका सहस्रबुद्धे, दक्ष आंग्रे, ऋग्वेद काणे, आरोही शिगवण यांनी बक्षिसे जिंकली. याशिवाय अनेकांनी लकी ड्रॉ बक्षिसे जिंकली.

सायक्लोथॉनसाठी प्रमुख अतिथी म्हणुन उपविभागीय अधिकारी डॉ अजित थोरबोले, दापोली होम्योपैथिक मेडिकल कॉलेजच्या डॉ जतकर, डॉ जोशी व टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी, डॉ किशोर जाधव, दापोली पोलीस निरीक्षक विवेक आयरे, मंदार बाळ, राहुल मंडलिक, संजय घोडावत कंझुमर टीम, मेनेकी, पेडलहेड, बायसायकलिस्ट टीम असे अनेक मान्यवर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांतर्फे सायकल स्पर्धकांचे स्वागत, पाहुणचार करण्यात आला. या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, सुरज शेठ, केतन, प्रशांत पालवणकर, विनय गोलांबडे, सर्वेश बागकर, अजय मोरे, राजेश कदम इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली.

न्युज अनकट प्रतिनीधी : मी पत्रकार (अंबरीश गुरव )

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा