जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकारांनी कामे सुचवावित: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

जालना ६ जानेवारी २०२४ : गेल्या नऊ वर्षांत जिल्ह्यामध्ये मूलभूत सुविधांसह विविध विकास कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्याचा मागास हा डाग पुसला गेला आहे. यापुढे निधीअभावी विकासाची कोणतीही कामे रखडणार नाहीत, अशी ग्वाही देतानाच अजूनही विकास कामे करण्याकरिता वाव असून, पत्रकारांनी विकासाची कामे सुचवावीत, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज येथे केले.

जालना शहरातील भारती लॉन्स येथे दर्पण दिनानिमित्त आयोजित सन्मान पत्रकारितेचा सत्कार पत्रकारांचा या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित पत्रकारांचा केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते सन्मान करून मराठी पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आ.कैलास गोरंट्याल, आ.नारायण कुचे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, जिल्हा माहिती अधिकारी प्रकाश धोंगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, उपाध्यक्ष भास्करराव दानवे पाटील, भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी- विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा