करोनाशी लढा देऊन १८ महिन्यांचा चिमुकला परतला घरी

नवी मुंबई, दि. २८ एप्रिल २०२०: राज्यात आज करोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ८५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

देशामध्ये सर्वात जास्त करोनाबाधित प्रकरणेही महाराष्ट्रात आहे ही चिंतेची बाब असली तरीही संसर्गित रुग्ण बरे होऊन घरी देखील जाताना दिसत आहेत. अशीच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एक अठरा महिन्यांचा चिमुकला कोरोनाशी युद्ध जिंकून पुन्हा घरी परतला आहे. त्यामुळे त्याच्या घरचे खूप झालेले दिसत आहेत. घरी परतताच या चिमुकल्या चे औक्षण करण्यात आले.

जसाई, उरण येथील हा १८ महिन्याचा चीमकला होता. गेल्या काही दिवसांपासून त्या वर उपचार चालू होते. त्यावर मात करत तो पुन्हा घरी परतला आहे. जासई गावात परत येतांना तहसिलदार, उरण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी (उरण पो ठाणे) हे या आनंदच्या क्षणी हजर होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा