Kia EV5 इलेक्ट्रिक SUV पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार, पूर्ण चार्जमध्ये ६०० किमी चा प्रवास

मुंबई, ३ सप्टेंबर २०२३ : कार निर्माता कंपनी Kia ने अलीकडेच जागतिक बाजारात नवीन इलेक्ट्रिक SUV लाँच केली आहे. अनेक दमदार फीचर्स आणि अतिशय फायदेशीर असलेली ही कार पुढील वर्षी भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. Kia EV5 ची झलक अधिकृत फोटोंद्वारे समोर आली आहे.

Kia EV5 इलेक्ट्रिक कारची लांबी ४६१५ मिमी, रुंदी १८७५ मिमी आहे. ही मोटर २१८ Bhp कमाल पॉवर आणि ३१० Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. यासोबत, असे सांगितले जाते की यामध्ये ८२ kWh NMC बॅटरी पॅक देखील दिला जाईल, ज्याच्या मदतीने ही कार एका पूर्ण चार्जमध्ये सुमारे ६०० किमीची रेंज देईल.

EV5 चे डिझाइन कंपनीच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV सारखे आहे. यापैकी काही डिझाइन घटक Kia च्या लहान EV4 मध्ये देखील समाविष्ट केले गेले आहेत. Kia EV5 मॅट आयव्हरी सिल्व्हरसह नऊ चमकदार रंगांमध्ये मिळेल. ज्यामध्ये मॅग्मा रेड, स्टाररी नाईट ब्लॅक, आयव्हरी सिल्व्हर, क्लियर व्हाइट, स्नो व्हाइट पर्ल, आइसबर्ग ग्रीन, टाइड ब्लू, फ्रॉस्ट ब्लू आणि शेल ग्रे यांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक SUV च्या किमती जाहीर केल्या नाहीत. पण असे सांगितले जात आहे की, कंपनी ही कार मार्केटमध्ये ४५ ते ५० लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा