देशभरात आजपासून CAA लागू; केंद्रानं काढली अधिसूचना

पुणे , १२ मार्च २०२४ : देशभरात आजपासून नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA कायदा आजपासून लागू झाला आहे. याचं नोटिफिकेशन केंद्र सरकारनं काढलं आहे. लोकसभा निवडणुकीचा तोंडावर मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा CAA लागू करण्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी परखडपणे भाष्य केलं होतं. देशात CAA ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकणार नाही, कारण हा देशाचा कायदा आहे, असं अमित शाहा यांनी सांगितलं होतं.तसेच CAA लागू करणे ही पक्षाची बांधिलकी असल्याचंही शाहा यांनी स्पष्ट केलं होतं. अखेर आज नागरिकत्व सुधारणा कायद्य CAA लागू करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे.

CAA कायदा नेमका काय?

CAA अंतर्गत, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या अत्याचारित गैर-मुस्लिम स्थलांतरितांना (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदाय) भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद केली आहे. 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी केले आहे. कायद्यानुसार, तीन शेजारील देशांतील अल्पसंख्याकांना CAA अंतर्गत लाभ मिळणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी ; सिध्देश शिगवण

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा