छत्रपती संभाजीनगर मधिल नागापुर येथे घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत एकता कबड्डी संघ ठरला प्रथम पारितोषिकाचा मानकरी

छत्रपती संभाजीनगर, कन्नड २७ ऑक्टोंबर २०२३ : छत्रपती संभाजीनगर मधिल नागापुर येथे घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत, पिशोर येथील एकता कबड्डी संघाने ११ हजाराचे प्रथम पारितोषिक पटकाविले. याप्रसंगी एकता संघाचा पिशोर ग्रामस्थांच्या वतीने आणि प्रा.मनोज मोकासे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा.मनोज मोकासे यांनी सांगितले की, जो खेळाच्या मैदानावर जिंकला तो आयुष्यातील खेळात नक्कीच विजयी होतो. मोकासे यांनी खेळाडूंना विश्वास देऊन खेळाचे महत्त्व सांगितले. या स्वागत समारंभास सामाजिक कार्यकर्ते आर.के.मोकासे, रवि वाघ, राजु डहाके, राजु मोकासे, गोकुळ डहाके, पांडुरंग दवंगे, अण्णा नवले, सुर्यभान दहेतकर, कैलास मोकासे, एकनाथ मोकासे, बबलू मोकासे, बळीराम मोकासे, विजय डहाके, नाना मोकासे, रामचंद्र सुरडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

न्यूज अनकट प्रतिनिधी : मिलिंदकुमार लांडगे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा