भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा टी-२० सामना आज

गुवाहाटी, २८ नोव्हेंबर २०२३ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका सध्या भारतात खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. टीम इंडियाने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. तसेच टीम इंडियाने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आज टीम इंडिया विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चमकदार कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया आज तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर हा सामना जिंकून लढत कायम ठेवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.

गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत फक्त तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. टी-२० मध्ये येथे सर्वोच्च धावसंख्या २३७ धावा आहे, जी भारताने २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती. येथे वेगवान गोलंदाजांना सीम आणि स्विंगमध्ये फारशी मदत मिळत नाही, तर फिरकीपटूंना टर्न मिळते.

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट/ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शॉन अ बॉट, नॅथन एलिस, अडम झम्पा, तन्वीर संघा.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा