मोठ्या भारतीय कंपन्या अडचणीत, इस्रायल-हमास युद्धामुळे करोडोंची गुंतवणूक धोक्यात

पुणे, १३ ऑक्टोंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून जगभरात इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाची ठिणगी आख्ख्या जगभर पसरली आहे. या युद्धामुळे जगभरात पुन्हा एकदा तणाव वाढला असुन यामुळे मोठ्या प्रमाणावर जागतिक अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. इस्रायल हे स्टार्टअप कंपन्यांचे केंद्र मानले जात असल्याने, आता इस्रायलमध्ये गुंतवणूक केलेल्या देशांतील कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अमेरिका आणि भारतासह अनेक देशांतील मोठ्या आयटी कंपन्यांनी तेथे मोठी गुंतवणूक केली आहे. हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास इस्रायली अर्थव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. मात्र, त्याचा परिणाम या कंपन्यांवरही होऊ शकतो. युद्धामुळे इस्रायलने ठराविक क्षेत्रातील राखीव नागरिकांना कर्तव्यावर बोलावले आहे. मात्र, हे लोक शिक्षक, तांत्रिक कामगार, डॉक्टर, परिचारिका, स्टार्टअप उद्योजक आणि पर्यटन क्षेत्रात काम करणारे आहेत. हे युद्ध असेच सुरू राहिल्यास हे मनुष्यबळ पुन्हा नियमित कामावर येऊ शकणार नाही. त्यामुळे विविध कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारतीय आयटी कंपन्यांची इस्रायलमध्ये गुंतवणूक आहे. २०१६ मध्ये विप्रोने विमानाचे स्पेअर पार्ट्स उत्पादक एचआर विकत घेतले होते. अशा स्थितीत आता या युद्धामुळे या कंपनीचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. टीसीएस चे इस्रायलमध्ये सुमारे १,१०० कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात कंपनीनचे २००५ पासून तेथे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत टीसीएस तिथेही अडचणीत येऊ शकते. एचसीएल टेकचे इस्रायलमध्ये दोन कार्यालये आहेत. कंपनीसाठी ही एक धोरणात्मक गुंतवणूक आहे. अशा परिस्थितीत आता या कंपनीची गुंतवणूकही धोक्यात आली आहे. भारताबरोबरच अमेरिकाही इस्रायलमध्ये गुंतवणूक करण्यात मागे नाही. अनेक अमेरिकन टेक कंपन्यांनी इस्रायलमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यात Microsoft, Alphabet (Google), Apple, Oracle, Intel या आणि अशा अनेक कंपन्या आहेत. अशा परिस्थितीत आता या कंपन्यांनाही तोट्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा