अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची अर्थसंकल्पात घोषणा – या आर्थिक वर्षात येणार 5G मोबाइल सेवा

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमन संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये 5G बद्दल देखील महत्त्वाची माहिती देण्यात आली. 5G ची प्रतीक्षा या वर्षी संपणार आहे. त्यांनी सांगितलं की 2022 मध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे.

2022 मध्ये 5G च्या स्पेक्ट्रम लिलावासह, त्याची सेवा आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जारी केली जाईल. 5G च्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी ही चांगली बातमी आहे. त्या म्हणाल्या की, सर्व गावे आणि लोकांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे.

या संदर्भात, 5G लाँच करण्यासाठी एक योजना आणली जाईल. अर्थसंकल्पात असंही म्हटलं होते की, पीपीपी मॉडेल अंतर्गत फायबर ऑप्टिक्सच्या माध्यमातून गावं आणि दुर्गम भागात इंटरनेट पुरवलं जाईल जेणेकरून प्रत्येकाला चांगली कनेक्टिव्हिटी मिळू शकेल.

टेलिकॉम कंपन्या सतत 5G चाचणी करत आहेत. या चाचणीत आश्चर्यकारक गती आढळून येत आहे. 5G चा वेग 4G पेक्षा 8 ते 10 पट जास्त आहे. 5G च्या चाचण्या भारतात बऱ्याच दिवसापासून सुरू आहेत.

आता अर्थसंकल्पात त्याची घोषणा झाल्यानंतर, या वर्षी 5G लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचं स्पष्ट झालंय. ज्या मोठ्या 13 शहरांमध्ये याच्या चाचण्या घेतल्या गेल्या आधी त्या शहरांमध्ये 5G उपलब्ध करून दिलं जाईल असं या अहवालात सांगण्यात आलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा