जालना जिल्हा वार्षिक योजनेच्या ३९६ कोटी ५९ लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

जालना ६ जानेवारी २०२४ : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता जालना जिल्ह्यासाठी रुपये ३९६ कोटी ५९ लक्ष ६२ हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगत जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत विकास कामांवर निधी वेळेत खर्च करावा. निधी परत जावू देऊ नये, अशी सूचना पालकमंत्री सावे यांनी केली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सावे बोलत होते. या बैठकीस केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्युज अनकट प्रतिनिधी- विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा