हिंगोली येथे घरफोडी करणारे अट्टल चोरटे स्था. गु. शा. हिंगोलीने केले गजाआड.

हिंगोली, २ फेब्रुवारी २०२४ : हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात होणारे मालाविरूध्दचे गुन्हे उघड करण्याबाबत पो. नि. श्री विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना वेळोवेळी सूचना देऊन मार्गदर्शन करीत असतात. त्या अनुषंगाने हिंगोली शहरात एन. टि. सी. परिसरामध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्या संदर्भाने दाखल गुन्हयाचा समांतर तपास करण्याच्या सुध्दा सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखांचे पथक माहिती घेत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, एन. टि. सी. परिसरामध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरी केलेले चोर सध्या इंदिरानगर, हिंगोली भागात आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनेश उर्फ दिन्या गणपत काळे, बालाजी उर्फ बाल्या गणपत काळे आणि त्यांचे इतर काही साथीदार यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन विचारपुस केली असता दोन्ही आरोपींनी एन. टि. सी. परिसरात २४ जानेवारीला रात्री बंद घर फोडले असून त्यांच्यासोबत अनिल उर्फ अन्या गणपत काळे व त्याच्या ओळखीचे इतर इसम होते. सदर चोरटयांनी ६४,००० रू किंमतीचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीवर मागील पंधरा वर्षातील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदरची कार्यवाही मा. श्री जी. श्रीधर पोलीस अधीक्षक हिंगोली, मा. श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री. विकास पाटील पो. नि. स्था. गु. शा. हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. श्री शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांचे पथकाने केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रभू नांगरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा