आज जागतिक हास्यदिन, स्माईलीचा जन्म

1999 पासून ऑक्टोबर महिन्यातला पहिला शुक्रवार हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे.
डिजिटल युगात चेहऱ्यावर हास्याचे प्रतिक म्हणजे स्माईलीची इमोजी. या स्माईलीचा जन्म कसा झाला? यावर एक नजर टाकुयात…
सोशल मिडियाची ओळख असलेली स्माईली 1963 साली जन्माला आली. त्याचे असे झाले कि, अमेरिकेतील एका विमा कंपनीचे दुसऱ्या कंपनीत विलीनीकरण झाले. त्यामुळे विमा कंपनीचे कर्मचारी नाराज झाल्याने त्यांची नाराजी दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू यावे यासाठी विमा कंपनीने जाहिरात कंपनी चालविणाऱ्या हार्वी रस बॉल याच्याशी संपर्क साधून काही करण्याचे सांगितले.
तेव्हा हार्वीने पिवळ्या रंगाचा एक हसरा चेहरा रेखाटला. तीच पहिली स्माईली. हा चेहरा विमा कंपनीच्या कामगारांना खूपच आवडला आणि लवकरच तो जगप्रसिद्ध झाला. हि स्माईली रेखाटण्यासाठी हार्वीने 45 डॉलर्स चार्ज केले होते

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा