जास्त पाणी पितात म्हणून १०हजार उंटाना घातल्या गोळ्या

सिडनी : चार महिन्यांपासून लागलेल्या भीषण आगीमुळे ऑस्ट्रेलिया सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशातच पाणीग्रस्त दक्षिण ऑस्ट्रेलियात जास्त पाणी पितात म्हणून १० हजारांहून अधिक उंटांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत एका इंग्रजी माध्यमाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
उंट मानवी वस्तीत येऊन पाण्याचा साठा संपवत आहेत, अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत होती. याची दखल घेत संबंधित विभागाने व्यायसायिक शुटर्संना उंटांना गोळया घालण्याचे आदेश दिले होते. या शुटर्संनी हॅलिकॉपटरमधून गोळ्या घालत १० हजारहून अधिक उंटांना ठार केले आहेत.
सध्या ऑस्ट्रेलियाच्या जंगलात महाभयानक आग लागली आहे.
या आगीत ५० कोटींहून अधिक प्राण्यांनी आपला जीव गमावला आहे. अशातच मानव स्वत:च्या हाताने उंटांना संपवत असल्याने संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उंट हा वाळवंटात राहणारा प्राणी आहे. तो अनेक दिवस पाण्याशिवाय राहू शकतो. तसेच उंट मोठ्या प्रमाणात मिथेन वायू उत्सर्जित करत असल्याने वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण वाढत असते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा