पुणे : पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अमेय दिलीप राहते ( वय २५) व तेजस रवि पांगर ( वय २२ दोघेही रा. काळाचौकी, अभ्युदयनगर, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.१५) रोजी पवना धरण परिसरात अमेय व तेजस हे अन्य दोन मित्रांच्या सोबत फिरायला आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण पाण्यात पोहण्याकरिता उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडुन दोघांचा मृत्यू झाला.
घटनास्थळाकडे आलेल्या इतर पर्यटकांनी अमेय व तेजस यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.