पीसीओडी: कारणे आणि उपाय

वयात येताना प्रत्येकच मूल थोडं घाबरून जातं, मात्र मुलींच्या बाबतीत काही गोष्टी त्यांच्या बाकीच्या शारीरिक समस्येला कारणीभूत ठरतात. पीसीओडी ही एक समस्या अनेक अडचणी निर्माण करू शकते. नेमकी ही समस्या आहे काय? त्याचे परिणाम आणि कारणं काय आहेत? उपाय काय करू शकता हे वाचा….
▪ पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरीयन डिसीज. यामध्ये गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या बीजांडग्रंथीचा (ovaries) आकार मोठा होऊन त्यात वेगवेगळ्या आकारांच्या बुडबुड्यांसारख्या गाठी (cysts) तयार होतात. यामध्ये स्त्रीबीजांड मोठे होण्याबरोबर इतरही चिन्हे दिसतात.
▪ रक्तातील इन्शुलिनची पातळी खूप जास्त होते. मेंदूमधील पिट्युटरी ग्रंथीमधून तयार होणार एलएच हा हार्मोन खूप वाढतो. त्याचाही ओव्हरीवर प्रभाव पडतो. रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते, पण त्याला प्रतिरोध होतो. त्यामुळे चरबीचे प्रमाण वाढते. वजन वाढत जाते.
▪ ओव्हरीमधून स्त्रीबीज तयार होत नाही. प्रोजेस्टरॉन हार्मोन्स कमी होतात. इस्ट्रोजनचे प्रमाण त्या मनाने वाढते. त्यामुळे पाळी लांबणे, अनियमित होणे, खूप रक्तस्राव होणे ही लक्षणे येतात.  याचा परिणाम असाही होऊ शकतो कि स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढू शकते.
उपाय : औषधे, विविध तपासण्या, पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हार्मोन्स तपासून बघणे गरजेचे. योग्य आहार, ताण कमी आणि योग्य व्यायाम करणे. रिलॅक्सेशन, मेडिटेशन, व्यायाम, आहार ठेवावा.  वजन व ताण कमी करणे. योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरते!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा