नवी दिल्ली : टोकियो ऑलम्पिक पात्रता फेरीतील एका सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत अमेरिकेच्या संघाचा मोठया फरकाने पराभव केला.अमेरिका संघाचा ५-१ अशा फरकाने पराभव केला आहे.
ओडिशातील कलिंग हॉकी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यावर भारतीय संघाने एकहाती वर्चस्व गाजवले. भारताच्या विजयात गुरजीत कौरने निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे भारताला विजय मिळवणे शक्य झाले .