गुना : मध्य प्रदेशातील गुना येथे फटाके बनवताना स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू आणि तीन लोक गंभीर जखमी झाले. शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजता हा स्फोट अवैध फटाका बनवताना झाले. स्फोट इतका वेगवान होता की घराची छत पूर्णपणे उडून गेली. या स्फोटात एक निष्पाप मुलासह दोन महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले. त्याचवेळी रुग्णालयात जात असताना दोन लोकांचा मृत्यू झाला.प्राथमिक माहितीनुसार, ज्या घरात स्फोट झाला त्या घरात बेकायदेशीरपणे फटाके तयार केले जात होते. हे घर रमजान खान यांनी भाड्याने घेतले होते.स्फोट इतका जोरदार होता की घराच्या विटा ३०-४० मीटर अंतरावर जाऊन पडल्या. हे घर पूर्णपणे उध्वस्त झाले असून या स्फोटात मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींमध्ये एक महिला रुखसर आणि एक तरूण समीर यांचा समावेश आहे.ज्या घरात हा स्फोट झाला आणि फटाके बेकायदेशीररीत्या बनवले जात होते ते पोलिस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावर आहे. काही दिवसांपूर्वी गुना कलेक्टरने देखील या बेकायदा फटाका घराची पाहणी केली होती .