‘या’ दोन अधिकाऱ्यांनी बनवला ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो, तोही अवघ्या ४५ मिनिटांत!

24

पाकिस्ताननं भारताच्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड हल्ला केला. यात २६ भारतीय पर्यटकांचा नाहक बळी गेला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला चढवला आणि शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला.

‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो

जितकी ‘ऑपरेशन सिंदूर’ची चर्चा झाली, तितकीच या ऑपरेशनच्या नावाची आणि त्याच्या लोगोचीदेखील चर्चा झाली. कारवाई केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात भारतीय सैन्याच्या ADGPI या एक्स हॅन्डलवरुन हा लोगो शेअर करण्यात आला. कित्येक नागरिकांनी सोशल मीडियावर हा लोगो शेअर केला. हा लोगो पहलगाम हल्ल्यात विधवा झालेल्या महिलांच्या वेदनेचं प्रतिक ठरला.

लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंह

पण तुम्हाला माहितीये, हा लोगो कुणी आणि कसा बनवला? हा लोगो कुणी बनवला याची माहिती आता समोर आलीये. भारतीय सैन्यदलातील दोन अधिकाऱ्यांनी हा लोगो बनवला असल्याचं समोर आलंय. लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंह अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. या दोघांनी अवघ्या ४५ मिनिटांत हा लोगो तयार केलाय. भारतीय लष्कराच्या ‘बातचीत’ या मासिकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हे दोघेही सैन्याधिकारी स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन विंगमध्ये कार्यरत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- विश्वजीत राळे