युवा मनःस्तिथी

आम्हा तरुणाची मनस्थिती यात अगदी अचुक पणे मांडली आहे. खरचं आगोदरची पिढी आम्हाला दिशाहिन नादान समजते, पोशाख राहणं, मौजमस्ती चैन करणं हेच आम्हाला आयुष्य वाटते असं ते समजतात पण खरं तर आम्ही तसे नाही काही तरी चांगले करण्याची दुर्दम्य इच्छा आम्ही पण बाळगून आहोतच. भ्रष्टाचाराने आणि अराजकतेने खिळखिळी झाली समाज व्यवस्था  पाहिली की आमचे  रक्त पेटुन उठते.
 
आता आम्हाला सगळं काही थांबनायचं स्वतः बद्दल विचार करायची प्रवृत्ती बदलायची आहे फक्त गलेलठ्ठ पगार घेऊन नौकरी स्विकारून स्वतःचे स्टैंडर्ड ऑफ लिव्हिंग सुधरवायचे हे आम्हांला नको आम्हाला हवाय स्वप्नातला भारत जिथे प्रत्येक मनुष्याला हसण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळेल प्रत्येक जण सुधरेल स्वतःहा बरोबर समाजही सुधरेल निष्क्रिय आणि स्वार्थी लोकांचा विचार सोडला तर आम्हच्या पिढीतल्या प्रत्येकाला समाज व्यवस्था बदलायची आहे  अन्याय अत्याचार थांबवायचे आहे देश प्रगती पथावर आणायचे आहे प्रवाह विरुद्ध पोहुन लोकांची टीका सहन करावी लागली तरी ती चालेल त्यासाठी मी किंवा माझ्या सारखी इतर तरुण मंडळी देखील सज्ज असतील पण आता डोळे उघडे ठेवून वावरायचे आहे आणि स्वतः हा बरोबर समाजाला आणि देशाला घडवायचे आहे.
ते सर्व करताना शून्यातून सुरवात आसेल आसे म्हणुन चालावे लागेल                                                                                                                                                               -शुन्य …………..

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा